रुग्णांच्या आरोग्यासाठीच बंद आंदोलन

आयएमएची पत्रकार परिषदेत माहिती

    दिनांक :05-Aug-2026
Total Views |
वर्धा
ima-wardha देशातील महाराष्ट्रातच फक्त एका डॉक्टरला दोन डिग्री देण्याचा प्रयोग सुरू झाला आहे. १ वर्षे किंवा ९० दिवसांचे प्रशिक्षण घेतलेल्याला एमबीबीएस समतुल्य काम करण्याची परवानगी देण्यात येत आहे. आमचा विरोध त्यांना परवानगी देण्याला नाही. परंतु, यातून रुग्णांच्या आरोग्यावर परिणाम होऊन वैद्यकीय क्षेत्रच बदनाम होण्याची भीती आहे. त्यामुळे आम्ही स्वत:साठी नव्हे तर रुग्णसेवेसाठीच आंदोलनाचे शस्त्र उपसले असल्याची माहिती आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण पावडे यांनी दिली.

ima wardha 
 
 
ima-wardha गेल्या दोन दिवसांपासुन राज्यात सर्वत्र आरोग्य सेवा बंद करण्यात आली असल्यासंदर्भात आज ५ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रदीप सुने, सचिव डॉ. विवेक चकोले, डॉ. सचिन पावडे, डॉ. जयंत मकरंदे, आयएमए विद्यार्थी संघटनेचे अ. भा. सचिव अताश राऊत उपस्थित होते.
ima-wardha डॉ. पावडे पुढे म्हणाले की, एमएआरडी, एएसएमआय या वैद्यकीय संघटनांनी आयएमएच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आम्ही कोणत्याही वैद्यकीय पद्धतीच्या विरोधात नाही. आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, सिद्ध, आधुनिक वैद्यक अशा प्रत्येक मान्यताप्राप्त वैद्यकीय शाखेला कायद्याने मान्यता दिली आहे. प्रत्येक शाखेचे स्वतःचे शैक्षणिक अभ्यासक्रम, उपचारपद्धती आणि कार्यक्षेत्र निश्चित केले आहे. आमचा विरोध कोणत्याही ‘पॅथी’ला नसून ‘मिक्सोपॅथी’ला असल्याचे डॉ. सचिन पावडे यांनी सांगितले.
 
ima-wardha रुग्णांवर उपचार करताना अपुरे प्रशिक्षण किंवा संबंधित विषयातील अधिकृत पात्रता नसताना दुसर्या शाखेतील उपचार करण्यास परवानगी देणे हे रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर परिणाम करणारे ठरू शकते. हे प्रकरण २०१४ पासुन न्यायालयात सुरू असताना राज्य सरकार ही घाई का करीत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. डॉ. जयंत मकरंदे यांनी प्रत्येक पॅथी वेगळी आहे. त्यांचे कॉन्सिलही वेगळे आहे. राज्यातच होमिओपॅथी आणि मॉडर्न मेडिसिन या दोन्ही ठिकाणी रजिस्ट्रेशन केले जात आहे. त्यांचा होमिओपॅथीचा अभ्यास झालेला असतो. त्यांना मॉर्डन मेडिसिनमध्ये प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्याचे कारण काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ima-wardha आम्ही दोन दिवसांपासुन काम बंद आंदोलन सुरू केले. ओपिडी बंद ठेवली. यानंतर आंदोलन अजून तीव्र करू उद्यापासुन शस्त्रक्रीयाही बंद होतील. परंतु, राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्यास त्याच क्षणी आम्ही काम सुरू करू असेही डॉ. पावडे यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थी संघटनेचाही या आंदोलनाला पाठींबा असल्याचे डॉ. अताश राऊत यांनी सांगितले. यावेळी नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. मोना राऊत, डॉ. स्वरूपा चकोले उपस्थित होते.