अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

    दिनांक :05-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
rape-of-minor-girl : कपीलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला कपीलनगर पोलिसांनी अटक केली. सुरज गौतम मडके (१९, मेंढेपठार, ता. काटोल, जि. नागपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
 

kl 
 
प्राप्त माहितीनुसार, १८ जून रोजी दुपारी १२ वाजता अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना, त्यांच्या ओळखीचा आरोपी सुरज गौतम मडके (१९, मेंढेपठार, ता. काटोल, जि. नागपूर) याने घरात शिरून तिच्या अल्पवयीन असण्याचा गैरफायदा घेतला आणि तिच्यावर जबरीने अत्याचार केला. तसेच या घटनेबद्दल कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, पीडित मुलीची प्रकृती बिघडल्याने पालकांनी तिला मेयो रुग्णालयात नेले असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पीडितेने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. या प्रकरणी तक्रारदारांनी दिलेल्या माहितीवरून कपीलनगर पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक रणजीत रणनवरे यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.