आता एसटीच्या तिकिट सवलतीला मोजावे लागतात दोन,तीन, पाच रूपये

अपघात सहाय्यता निधी, स्वच्छता अधिभार द्यावा लागेल

    दिनांक :06-Aug-2026
Total Views |
प्रवाशांनी सुटे पैसे सोबत ठेवावे
 
 
बुलढाणा,
accident assistance fund गाव तेथे एसटी बस बहुजन हितासाठी धावणारी लालपरीला सवलतीच्या योजनांमुळे मागणी वाढली आहे. बसस्थानकावर महिला जेष्ठ नागरिक दररोज बाहेरगावी शिक्षण व नोकरी साठी जाणारे प्रवासी यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महामंडळाच्या जिल्हा विभाग नियंत्रक कार्यालयाला त्यातून तोट्यात असलेली एसटी कोट्यावधी रूपयांचा फायदा करून देत आहे. बुलढाणा विभाग गेल्या दोन वर्षापासून विभागात अव्वल आहे.
 
 
accident assistance fund
 
एसटी महामंडळाच्या नवीन निर्णयानुसार ज्या प्रवाशांना सवलत नाही परंतू महिला व ६५ वर्षावरील पुरुषांना अर्धे टिकिट प्रवास भाडे द्यावे लागते. त्यांना आता तिन रूपये मोजावे लागत आहे. त्यामध्ये एक रूपया अपघात सहाय्यता निधी शिवाय स्वछता अधिभार यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच स्वतंत्र्य सैनिक, अधिस्विकृती पत्रकार लोककलावंत याशिवाय इतरांना असलेल्या मोफत प्रवास तिकीट योजनेवर सुद्धा या पद्धतीने दोन रूपये अधिभार द्यावा लागतो. सेवानिवृत्त एसटी महामंडळाचे कर्मचारी चालक वाहक ज्यांनी सेवा दिली त्यांना सुद्धा पाच रूपये अधिभार द्यावा लागतो. एसटी बसचा लाभ घेणार्‍यांची गर्दी वाढत आहे. दिवसभर विविध शासकीय कार्यालय याशिवाय इतर वैक्यतिक कामासाठी प्रवाशी प्रवास करतांना दिसतात. जिल्हास्थानी असलेल्या विविध पक्षसंघटनेच्या मोर्चा आंदोलन कार्यक्रमासाठी सुद्धा अशा प्रवाशांची संख्या वाढली आहे.
 
  
त्यात महिलांचा सहभाग जास्त आहे. वयोगट ५ ते १२ वर्ष मुलांना अर्धे तिकीट असल्याने त्यांचे अधार कार्ड प्रवाश्यांजवळ आवश्यक आहे. ७५ वर्ष पार केलेल्या वर्यावृद्ध जेष्ठ प्रवाशांची संख्या सुद्धा वाढली आहे. त्यांच्या वयाची तपासणी करणे आवश्यक आहे. प्रवास करतांना गुटखा खाऊन बसमध्ये थूकणार्‍यांची संख्या लक्षात घेता त्यांच्यावर शिस्त व कायद्याच्या नुसार दंडात्मक कारवाई आवश्यक आहे. बसमध्ये महिलांच्या छेडखाणीचे प्रकार वाहकांशी वाद घालणारे प्रवाशांना बसस्थानकावर असलेली अतिरीक्त पथकांनी कारवाई करणे आवश्यक झाले आहे. दररोज धावणारी लालपरी निमआराम, शिवाई प्रवाशी सुविधामध्ये वाढ करतांना प्रवाशांची संख्या लक्षात घेता खामगांव, चिखली, मेहकर, अकोला या बसफेर्‍याची वाढ करणे आवश्यक असल्याची मागणी प्रवासी सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.