घटनास्थळावर घटना घडल्याचा कोणताही पुरावा नसल्याने आरोपीची सुटका

- अत्याचार प्रकरणातील आरोपी निर्दोष

    दिनांक :06-Aug-2026
Total Views |
नागपूर, 
अनिल कांबळे 
crime news एखादी घटना ही विशिष्ठ घटनास्थळावर घडल्याची तक्रार करण्यात येते आणि प्रत्यक्षात ती घटना तेथे घडण्याबाबत संशय असतो,अशी स्थिती असते, अशावेळी दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत संशय निर्माण होतो. परिस्थितीजन्य पुरावे नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आरोपींवर पूर्वग्रह बाळगून तक्रार दिल्याचा संशय व्यक्त करीत जिल्हा सत्र न्यायालयाने अत्याचाराच्या घटनेतील आरोपीला निर्दोष मुक्त केले.
 

पुरावा नसल्याने आरोपीची सुटका 
 
 
 
पीयूष निनावे हा भंडारा शहरात राहतो. तर पीडित तरुणी संजना (काल्पनिक नाव) पूर्वी भंडारात राहत होती. तिचे वडिल तेथे शासकीय सेवेत होते. पीयूष आणि संजना हे दोघेही एकाच महाविद्यालयात शिकत होते. दोघांची शिकताना ओळख झाली. दोघांचे काही दिवसांत प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांच्या भेटी होत गेल्या. दरम्यान, मुलगी पुढील शिक्षणासाठी नागपुरात राहायला आली. त्यानंतरही दोघांच्या भेटी नियमित होत होत्या. जुलै २०२३ रोजी पीयूष हा नागपुरात आला. त्याने संजनाला अंबाझरी तलावावर भेटायला बोलावले. त्यावेळी त्याने अंबाझरी तलावावर सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याचा आरोप संजनाने लावला आहे. तो भंडाऱ्याला निघून गेल्यानंतर त्याचे अन्य एका तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याबाबत संजनाला माहिती मिळाली. तिने थेट अंबाझरी पोलिस ठाण्यात पीयूषविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तक्रारीत अश्लील फोटोंची मागणी केल्याचा समावेश केला. काही दिवसानंतर अंबाझरी पोलिस ठाण्यात पीयूषविरुद्ध भंडाऱ्यातील एका मिस्किन ट्रॅक गार्डनवर नेऊन अश्लील कृत्य केल्याचा आरोप केला. अंबाझरी पोलिसांनी गुन्ह्यात पीयूषविरुद्ध कलमवाढ केली. मात्र, न्यायालयात पोलिसांचे आरोपपत्र टिकू शकले नाही. ॲड. प्रणित वैरागडे यांनी दावा केला की, पीडित संजना हीने अंबाझरी सारख्या सार्वजनिक ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. तसेच तिने स्वत:हून मेडिकल करण्यास नकार दिला आहे. तसेच दुसरे घटनास्थळ भंडारा येथील मिस्कीन गार्डन असून तेथे दिवसभर नागरिकांची मोठी गर्दी असते.crime news त्यामुळे तेथे लैंगिक अत्याचार करणे शक्य नाही, अशी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतली. ‘घटनास्थळावर घटना घडल्याचा परिस्थितीजन्य पुरावा दिसून येत नाही. तसेच घटना घडल्याच्या दोन महिन्यांनंतर पीडितीने तक्रार देण्याचे कारण स्पष्ट नाही.’ असे निरीक्षण नोंदवले. आरोपींविरुद्ध ठोस पुरावे आढळून न आल्याने न्यायालयाने आरोपी पीयूषची निर्दोष सुटका केली.पीयूषची बाजू ॲड. प्रणित वैरागडे यांनी मांडली.