अंबानगर ज्येष्ठ नागरिक मंडळात गुरुपौर्णिमा उत्सव

    दिनांक :06-Aug-2026
Total Views |
नागपूर,
ambanagar citizens-association अंबानगर, दिघोरी येथील माँ अंबानगर ज्येष्ठ नागरिक मंडळात विठ्ठल-रुक्मिणी व हनुमान मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव आणि जुलै महिन्यातील ज्येष्ठ सदस्यांचा वाढदिवस समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.
 

546 
 
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेव भांडारकर होते. दीपप्रज्वलन व पूजनानंतर महिला मंडळाने भजन सादर करून भक्तिमय वातावरण निर्माण केले. सचिव सागर सोनवणे यांनी मंडळाच्या कार्याचा आढावा घेत गुरुपौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट केले. नामदेवराव भांडारकर यांनी भारूड सादर केले, तर अशोक काष्टी व किशोर पठाडे यांनी अध्यात्म आणि गुरु-परंपरेचे महत्त्व विशद केले.यावेळी जुलै महिन्यात वाढदिवस असलेल्या मंडळातील ज्येष्ठ सदस्यांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन नंदकिशोर उजवणे यांनी, तर आभारप्रदर्शन चंद्रशेखर रहाटे यांनी केले. कार्यक्रमानंतर उपस्थितांना अल्पोपहार व प्रसादाचे वितरण करण्यात आले.
सौजन्य:सतीश देशपांडे ,संपर्क मित्र