सुदर्शन क्रियेतून मानसिक-शारीरिक आरोग्य जपा -झरना डे

    दिनांक :06-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Art of Living ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या प्रबोधन समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मेंटर व लाईफ कोच झरना डे यांनी ज्येष्ठ नागरिकांना नियमित प्राणायाम, भस्त्रिका आणि सुदर्शन क्रिया करण्याचा सल्ला दिला. मन प्रसन्न, चित्त शुद्ध आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी श्वसन प्रक्रियेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे सचिव डॉ. राजू मिश्रा होते. व्यासपीठावर जलयोद्धा डॉ. प्रवीण डबली, वर्षा चरडे, नानासाहेब समर्थ आणि डॉ. संजय उगेमुगे उपस्थित होते.
 

surdarshan 
 
 
 
झरना डे यांनी शरीर, मन आणि श्वास ही ईश्वराची अमूल्य देणगी असल्याचे सांगत श्वासोच्छवासाचा योग्य वापर आरोग्यासाठी अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले. यावेळी जलयोद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. प्रवीण डबली यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी ज्येष्ठांना झोपून मोबाईलचा वापर टाळण्याचा तसेच बसताना व उभे राहताना मेरुदंड सरळ ठेवण्याचा सल्ला दिला.कार्यक्रमात योग शिक्षिका डॉ. पाचुंडे, डॉ. बी. टी. वाघ, माधुरी व राजेश कुंभलकर तसेच प्रतिष्ठानला सहकार्य करणाऱ्या विविध ज्येष्ठ नागरिक मंडळे आणि व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक दिलीप कातरकर यांनी, सूत्रसंचालन डॉ. मंगला गावंडे यांनी तर आभारप्रदर्शन प्रभाकर डोकरीमारे यांनी केले.
सौजन्य: डॉ. प्रवीण डबली,संपर्क मित्र