बाबुलबन येथे आयुर्वेद जनजागृती कार्यक्रम

    दिनांक :06-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Ayurveda Public Awareness केंद्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषद (CCRAS) आणि आयुष मंत्रालयाच्या ‘आयुष्या अभियान’ अंतर्गत बाबुलबन येथील सुगत बुद्ध विहारात आयुर्वेद जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. समाजसेविका मंगला तिरपूडे व डॉ. सुमिता जैन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
 
mate2
 
यावेळी आयुर्वेद तज्ज्ञांनी निरोगी जीवनशैली, औषधी वनस्पतींचे महत्त्व, रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे आणि आयुष मंत्रालयाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमात डॉ. राजेंद्र सोनेकर, डॉ. सुमिता जैन, डॉ. दत्तात्रेय काटेकर, डॉ. सविता शर्मा आणि डॉ. वनमाला वाकोडे यांनी नागरिकांशी संवाद साधला. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
सौजन्य;अशोक माटे,संपर्क मित्र