रिसोड,
development plan for risod शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नगर परिषद, रिसोडच्या वतीने रिसोड शहर विकास आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्याला मंजुरी व निधी मिळवण्यासाठी नगराध्यक्ष भगवान क्षीरसागर यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शासकीय कार्यालयात भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
या भेटीत नगराध्यक्ष भगवान क्षीरसागर यांनी रिसोड शहर विकास आराखड्या अंतर्गत शहरातील अंतर्गत सिमेंट रस्ते, नाली व सांडपाणी व्यवस्थेचे सक्षमीकरण करणे, पाणीपुरवठा योजना, उद्यान, सभागृह, व व्यापारी संकुलाचा विकास, शहरामध्ये भव्य प्रवेशद्वार व सुशोभीकरण व स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे याबाबत सविस्तर निवेदन देवून चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागांना आराखड्याचा तातडीने आढावा घेऊन निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. रिसोडच्या विकासासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या मार्गदर्शनामुळे व माजी खा. अनंतराव देशमुख, खा. अनुप धोत्रे, आ. भावना गवळी यांच्या नेतृत्वामध्ये रिसोड शहराचा विकास आराखडा आता प्रत्यक्षात उतरणार आहे.development plan for risod या आराखड्यामुळे रिसोडचे रूप पालटेल आणि नागरिकांना सर्व मूलभूत सुविधा मिळतील. या प्रसंगी आमदार श्याम खोडे व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.