राष्ट्रसंतांचे विचार हा अनमोल ठेवा : डॉ. गिरीश गांधी

    दिनांक :06-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Durgadas Rakshak Smruti Pratishthan कर्मश्री दुर्गादास रक्षक स्मृती प्रतिष्ठानतर्फे दाभा येथील सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्रात आयोजित 'कर्मश्री दुर्गादास रक्षक स्मृती जीवन गौरव पुरस्कार' सोहळ्यात विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले.
 

jivan 
 
यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रमोद काळबांडे व श्रीपाद अपराजित यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी मंत्री अनिल देशमुख यांनी या पुरस्काराला सकारात्मक आणि निर्भीड पत्रकारितेचा गौरव असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन ज्ञानेश्वर रक्षक यांनी केले.
सौजन्य:ज्ञानेश्वर रक्षक,संपर्क मित्र