मानोरा,
manora news तालुक्यातील तळप बु. येथे सुमारे ३०० वर्षे जुना मातीचा बुरुज ५ ऑगष्ट रोजी ५ वाजता दरम्यान पावसामुळे बुरुज ढासळून एक दुर्दैवी घटना घडली. यामध्ये पतीचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. या दुदैवी घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार तळप बु येथील सतीष इंगोले हे गावातील पुरातन बुरूजाजवळ राहतात. बुधवारी सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास बुरूजाजवळ उभे असताना व पत्नी घरासमोर भांडे धुत असताना बुरुजाचा काही भाग अचानकच कोसळला. या दुर्दैवी घटनेत पती , पत्नी ढिगार्याखाली दबल्याने पतीचा घटनास्थळीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ही वार्ता गावातील नागरिकांना माहिती पडताच त्यांनी तातडीने वाचविण्यासाठी घटनास्थळी पोहचून बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न केले.manora news परंतु त्यांचा प्रयत्न असफल ठरला. ग्रामस्थानी सतीश इंगोले व त्यांच्या पत्नीला दबलेल्या बुरुजाच्या ढिगार्यातून बाहेर काढून शासकीय सामान्य ग्रामीण रुग्णालय मानोरा येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉटरांनी एकाला मृत घोषित केले. तर पत्नी गंभीर जखमी झाल्याने पुढील उपचारासाठी दिग्रस येथे रेफर केले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकाचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतकाच्या पश्चात कुटुंबात पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार असल्याचे समजते.