हडस प्रायमरी स्कूलमध्ये हिरोशिमा दिनाचे आयोजन

    दिनांक :06-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Hiroshima Day हडस प्रायमरी स्कूलमध्ये ६ ऑगस्ट रोजी हिरोशिमा दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मुख्याध्यापिका मृणाल कासखेडीकर यांच्या हस्ते अणुबॉम्ब हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी दोन मिनिटे मौन पाळले.

school 
 
 
इयत्ता ८वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांना हिरोशिमावरील माहितीपट दाखविण्यात आला. वरिष्ठ भौतिकशास्त्र शिक्षिका निधी मुळे यांनी अणुऊर्जा, किरणोत्सार आणि अणुकेंद्रीय संकल्पनांवर मार्गदर्शन केले, तर वरिष्ठ भाषा शिक्षिका दर्शना भालेराव यांनी विज्ञानाचा उपयोग मानवकल्याणासाठी व्हावा, असा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी तांत्रिक व्यवस्थापन व छायाचित्रणाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. कार्यक्रमाचे समन्वयन दर्शना भालेराव यांनी केले.
सौजन्य:गजानन रानडे ,संपर्क मित्र