नागपूर,
Inner Wheel Club of Nagpur इनर व्हील क्लब ऑफ नागपूरने अध्यक्षा पूजा सावजी यांच्या नेतृत्वाखाली आरोहा संस्थेच्या NAMS उपक्रमाच्या सहकार्याने आदिवासी बांधवांसाठी समाजोपयोगी सेवा प्रकल्प राबविला.
'पुनरूपी वस्त्रम' उपक्रमांतर्गत जुने कपडे, बेडशीट्स व पडद्यांचे संकलन करून त्यांचा पुनर्वापर करण्यात येणार असून, या वस्तू हेमलकसा व बस्तर परिसरातील आदिवासी कुटुंबांना वितरित करण्यात येणार आहेत. तसेच गरजू मातांसाठी बाळंतविडा किट तयार करण्यासाठी क्लबने ₹१२ हजारांची आर्थिक मदत दिली.या उपक्रमाचा लाभ सुमारे ५०० आदिवासी कुटुंबांना होणार असून, पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकीचा संदेश या प्रकल्पातून देण्यात आला.
सौजन्य:मीनाक्षी देशपांडे,संपर्क मित्र