मर्दडी देवी मंदीरात सहा लाखाच्या दागिण्याची चोरी

आरोपी सीसीटीव्हीत कैद * कुलुप तोडून गाभार्‍यात प्रवेश

    दिनांक :06-Aug-2026
Total Views |
बुलढाणा, 
mardadi devi temple सुप्रसिद्ध श्रीक्षेत्र मर्दडी देवी मंदीरात दि. ५ ऑगस्ट रोजीच्या पहाटे अज्ञात चोरट्यांनी देवीच्या गळ्यातील व गाभार्‍यात असलेल्या दान पेटी फोडून भाविक भक्तांनी दोन केलेले सोने चांदीचे दागीण्यांची धाडसी चोरी केल्याची घटना घडली आहे.
 

mardadi devi temple 
 
 
धाड पोस्टेचे ठाणेदार मोरे यांनी घटने संदर्भात माहिती देतांना सांगितले मर्दडी देवी मंदीरात रात्री साडेनऊ वाजता पूजारी कुलुप बंद करून आरामासाठी निघून गेले. सकाळी पूजारी पांडूरंग दांडगे यांना मंदिरात चोरी झाल्याचे आढळले. अज्ञात आरोपी सिसीटीव्ही फुटेज मध्ये मध्यरात्री दिड ते सव्वा दोनच्या सुमारास रेनकोट घालून तोंडाला कपडे बांधून आलेले दिसतात त्यांनी भक्तांनी दान केलेले देवीच्या मुर्तीवर असलेले सोने चांदीचे दागिण्याची चोरी केली आहे. त्यामध्ये अंदाजे अडिच तोळे सोन्याचे दागीणे, चांदी अडीच किलो किमत बाजारभावाने सहा लाख रूपये आहे.mardadi devi temple दागीणे चोरी करणार्‍याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. घटनास्थळी उपअधिक्षक अमोल गायकवाड, बुलढाणा ठाणेदार संग्राम पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.