शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्काराने सन्मानित

    दिनांक :06-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Nagpur University Foundation Day राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०३ व्या वर्धापनदिनानिमित्त शिक्षकेत्तर कर्मचारी विलास पंचम, देविदास घोडाम आणि सुरेंद्र नारळे यांना आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
 
56
 
 
 
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील आणि नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व पुरस्कार रक्कम देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी आमदार डॉ. आशिष देशमुख, प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे, कुलसचिव डॉ. विजय खंडाळ तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य:रमेश मेहर,संपर्क मित्र