ब्रेकअपचा सूड; इंस्टाग्रामवरुन प्रेयसीचे अश्लील फोटो व्हायरल

- पुण्यातील तरुणाविरुद्ध गुन्हा

    दिनांक :06-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
revenge for breakup प्रेमसंबंध संपुष्टात आल्यानंतर सूडाच्या भावनेतून तरुणीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून तिचे खासगी व अश्लील फोटो सोशल मीडियावर प्रसारित करणे, बदनामीकारक मजकूर पोस्ट करणे तसेच तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी पुण्यातील एका २७ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लीला करण सिंग (वय २७, रा. लोहेगाव, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार २२ वर्षीय तरुणी ही मानकापूर परिसरातील रहिवासी असून खासगी कंपनीत नोकरी करते.
 

ब्रेकअपचा सूड; इंस्टाग्रामवरुन प्रेयसीचे अश्लील फोटो व्हायरल 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि आरोपी यांच्यात यापूर्वी प्रेमसंबंध होते. त्यादरम्यान आरोपीने त्याच्या मोबाईलमध्ये तरुणीचे काही खासगी व वैयक्तिक फोटो काढून ठेवले होते. काही काळानंतर दोघांचे संबंध तुटल्यानंतर आरोपीने सूडाच्या भावनेतून तरुणीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते तयार केले. या बनावट खात्यावरून आरोपीने तरुणीचे खासगी व जिव्हाळ्याचे फोटो तिच्या परवानगीशिवाय अपलोड केले. तसेच दोघांचे एकत्रित फोटो आणि वैयक्तिक क्षणांची छायाचित्रे इन्स्टाग्राम स्टोरीवर आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकुरासह प्रसारित करून तिची सामाजिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.revenge for breakup याशिवाय आरोपीने तक्रारदाराच्या भावाला दूरध्वनीवर संपर्क साधून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. सोशल मीडियावरील छळासोबतच थेट धमक्या दिल्यामुळे पीडित तरुणीने मानकापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे मानकापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.