प्रदीप रावतसाठी सलमानची पोस्ट!

    दिनांक :06-Aug-2026
Total Views |
मुंबई,
Salman's post for Pradeep Rawat बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे ब्लड कॅन्सरशी सुरू असलेल्या लढ्यानंतर ४ जुलै २०२६ रोजी निधन झाले. वयाच्या ७४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. ५ जुलै २०२६ रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. प्रदीप रावत यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. विशेषतः लगान आणि गजनी या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या. विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारत त्यांनी अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.

s3464567
 
 
त्यांच्या निधनानंतर अभिनेता सलमान खान यांनीही भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. बागी : अ रेबेल फॉर लव्ह या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. सलमान खान यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर या चित्रपटातील दोघांचा एक फोटो शेअर करत, "भाई, तुझ्यासोबत अनेक सुंदर क्षण घालवले. तुमच्या आत्म्यास शांती लाभो," अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आली.प्रदीप रावत यांच्यावर ब्लड कॅन्सरचे उपचार सुरू होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्रकृती खालावत गेली आणि अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी कल्याणी रावत आणि मुलगा विक्रमादित्य रावत असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक अनुभवी आणि गुणी कलाकार गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.