२०२७ विश्वचषकासाठी आयर्लंडला मोठा झटका!

आता कठीण पात्रता फेरीचा मार्ग

    दिनांक :06-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Setback for Ireland for the 2027 World Cup २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी थेट पात्र ठरण्याच्या शर्यतीत आयर्लंडला मोठा धक्का बसला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने आयर्लंडचा थेट प्रवेशाचा मार्ग बंद झाला आहे. या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही. त्यामुळे मालिकेतील उर्वरित चार सामने जिंकले तरी आयर्लंडला थेट विश्वचषकाचे तिकीट मिळणार नाही.थेट पात्रतेसाठी आयर्लंडसमोर एकमेव पर्याय म्हणजे अफगाणिस्तानला पाच सामन्यांच्या मालिकेत ५-० अशी धूळ चारणे आणि त्याचवेळी भारत-वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेचा निकालही त्यांच्या बाजूने लागणे आवश्यक होते. अशा परिस्थितीत आयर्लंडच्या आयसीसी क्रमवारीत सुधारणा होऊन थेट प्रवेशाची संधी निर्माण झाली असती. मात्र, पहिलाच सामना पावसामुळे रद्द झाल्याने आता आयर्लंडला मालिका जास्तीत जास्त ४-० नेच जिंकता येणार असून थेट पात्रतेची शक्यता संपुष्टात आली आहे.
 
 

sare46 
 
तथापि, आयर्लंडचे विश्वचषकाचे स्वप्न अद्याप संपलेले नाही. आता त्यांना पात्रता स्पर्धेतून मार्ग काढावा लागणार आहे. या पात्रता फेरीत जगभरातील १० संघ सहभागी होतील. या स्पर्धेत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवणाऱ्या संघाला थेट विश्वचषकात प्रवेश दिला जाईल.दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघांमध्ये त्यानंतर सुपर सिरीज खेळवली जाईल. या सिरीजमध्ये अव्वल ठरणारा संघ विश्वचषकासाठी पात्र ठरेल, तर उर्वरित दोन संघांचे आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे या मार्गाने विश्वचषकात स्थान मिळवणे अधिक कठीण मानले जात आहे. यापूर्वीही आयर्लंडला २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र होता आले नव्हते. सुपर सिक्स टप्प्यातील अपयशामुळे त्यांना स्पर्धेबाहेर व्हावे लागले होते. आता २०२७ च्या विश्वचषकासाठीही थेट प्रवेशाची संधी गमावल्याने आयर्लंडसमोर पुन्हा एकदा कठीण पात्रता फेरीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.