नागपूर,
Shree Jagrateshwar Mandir Devasthan श्री जागृतेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे सामाजिक कार्यकर्ते व शिवभक्त भूषण दडवे यांचा सत्कार करण्यात आला. जागृतेश्वर मंदिराला २०११ मध्ये ‘क’ तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा गौरव यावेळी करण्यात आला.
मंदिराच्या जीर्णोद्धार व सौंदर्यीकरणासाठी शासनाकडून निधी मिळविण्याबाबत आमदार प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी मंदिराला ‘ब’ तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, अशी मागणी पुन्हा करण्यात आली. ट्रस्टचे पदाधिकारी, नगरसेवक हेमंत बरडे, तुषार लारोकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. मंदिराच्या विकासासाठी पुढेही प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
सौजन्य:राजेश हरडे,संपर्क मित्र