solar eclipse on 3 zodiac signs वैदिक पंचांगानुसार २०२६ मधील शेवटचे सूर्यग्रहण १२ ऑगस्ट रोजी होणार असून, ज्योतिषशास्त्रात या घटनेला विशेष महत्त्व दिले जाते. सूर्य हा आत्मविश्वास, नेतृत्व, प्रतिष्ठा, शासन, वडील आणि जीवनशक्तीचा कारक ग्रह मानला जात असल्याने सूर्यग्रहणाचा काही राशींवर मानसिक, व्यावसायिक आणि आर्थिक स्तरावर परिणाम होऊ शकतो, अशी ज्योतिषांची धारणा आहे. विशेषतः कर्क, धनु आणि मीन राशीच्या व्यक्तींनी या काळात अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण १२ ऑगस्ट रोजी रात्री ९.०४ वाजता सुरू होऊन १३ ऑगस्ट रोजी पहाटे ४.२५ वाजेपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. हे ग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे येथे सूतक काळ किंवा धार्मिक नियम लागू होणार नाहीत. मात्र, ग्रहण कर्क राशीत होत असल्याने त्याचा काही राशींवर ज्योतिषीय प्रभाव जाणवू शकतो, असे मानले जाते.
- ज्योतिषांच्या मते, कर्क राशीच्या व्यक्तींवर कामाचा ताण वाढू शकतो. नोकरीत जबाबदाऱ्या वाढण्याची तसेच कामानिमित्त प्रवासाची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना संधी मिळू शकते, मात्र मानसिक तणाव वाढू शकतो. घाईघाईने निर्णय घेणे टाळावे आणि विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले जाते.
- धनु राशीच्या व्यक्तींनी कार्यक्षेत्रात विरोधकांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. मित्रांशी मतभेद होण्याची शक्यता असून त्यातून तणाव वाढू शकतो. व्यवसायातील गती मंदावू शकते तसेच नियोजित खरेदी पुढे ढकलावी लागू शकते. न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित असतील तर चिंता वाढू शकते. वडिलांशी मतभेद होण्याची शक्यता असून आत्मविश्वासात घट जाणवू शकते.
- मीन राशीच्या व्यक्तींनी या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला दिला जात आहे. आहारावर नियंत्रण ठेवावे आणि आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे योग्य ठरेल. कामात विलंब, अनावश्यक खर्च आणि आर्थिक दबाव वाढू शकतो. नवीन व्यक्तींशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. कुटुंबासोबत वेळ घालवल्यास मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल, असे ज्योतिषांचे मत आहे.