नागपूर,
Swavalambi Nagar, Nagpur जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाची शाखा असलेल्या श्रीराम योगाभ्यासी मंडळ, राम मंदिर, स्वावलंबी नगर येथे गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
योगगुरू मिलिंद वझलवार यांनी योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व, संस्कार आणि सामाजिक एकात्मतेवर मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन शुभदा व्याहाडकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन मोहिनी देशमुख यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सौजन्य:विवेक मेंढी,संपर्क मित्र