बुलढाणा,
rajmata jijau government medical college राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील डॉटरांनी अत्यंत गुंतागुंतीची आणि अतिधोकादायक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडत एका महिलेला नवजीवन दिले. दोन तास शस्त्रक्रियेत महिलेच्या पोटातील तब्बल साडे पंधरा किलोग्रॅम वजनाची अंडाशयातील गाठ, तसेच गर्भाशय आणि पोटातील चरबीचा थर यशस्वीपणे काढण्यात आले. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
महिला रुग्ण गंभीर आजारांनी त्रस्त होती. त्यातच पोटातील प्रचंड आकाराच्या गाठीमुळे आतड्यांवर मोठा दाब निर्माण झाला होता. त्यामुळे तिला अन्न घेणे, पचन होणे आणि दैनंदिन हालचाली करणेही अशय झाले होते. सततच्या अशक्तपणामुळे तिची प्रकृती अत्यंत खालावली होती. अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया करणे हे डॉटरांसाठी मोठे आव्हान होते.
भूल देण्यापासून ते शस्त्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रत्येक टप्पा अत्यंत जोखमीचा होता. मात्र, तज्ज्ञ
या शस्त्रक्रियेसाठी शल्यचिकित्सक डॉ. निखिल नलावडे, डॉ. गौरव गायकवाड, डॉ. किशोर वानखेडे आणि डॉ. शुभम पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, तर भूलतज्ज्ञ डॉ. सुवर्णा काटकर यांनी जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले असून तिची प्रकृती आता हळूहळू सुधारत असल्याची माहिती डॉ. निखील नलावडे यांनी दिली. शा rajmata jijau government medical college सकीय रुग्णालयात एवढी दुर्मिळ लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात समाधान व्यक्त होत आहे.