वैदर्भीय हरि कीर्तन संस्थेच्या वर्धापन दिनास प्रारंभ

    दिनांक :06-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Vaidarbhiya Hari Kirtan Sanstha वैदर्भीय हरि कीर्तन संस्था आणि दुर्गा देवी सार्वजनिक देवस्थान, राणा प्रताप नगर यांच्या संयुक्त विद्यमाने कीर्तन संस्थेच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त पंचदिवसीय कीर्तन महोत्सवास प्रारंभ झाला. हा सोहळा ५ ते ९ ऑगस्टदरम्यान दररोज सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत दुर्गा मंदिर, राणा प्रताप नगर येथे होत आहे.
 
 
nma2
 
 
 
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ह.भ.प. नूपूर देशपांडे यांनी कीर्तन सेवा सादर केली. या पंचदिवसीय कीर्तन सोहळ्याचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सौजन्य:प्रशांत मनभेकर,संपर्क मित्र