नागपूर,
Vasantrao Deshpande Hall मुंबईतील लोकप्रिय विनोदी नाटक'थेट तुमच्या घरातून चा नागपूरातील पहिला प्रयोग वसंतराव देशपांडे सभागृहात हाऊसफुल झाला. प्रसाद खांडेकर लिखित-दिग्दर्शित आणि नम्रता संभेराव यांच्या दमदार अभिनयाने सजलेल्या या नाटकाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
'बिग बॉस'च्या पार्श्वभूमीवर उलगडणाऱ्या कथेत कुटुंबातील सदस्यांना एकत्र राहण्याची वेळ येते. त्यातून नात्यांतील भावनिक गुंतागुंत, परस्परांवरील प्रेम, काळजी आणि संवादाचा अभाव प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. नाटकातील विनोद, भावनिक प्रसंग आणि अनपेक्षित क्लायमॅक्स यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवतानाच अंतर्मुखही केले.नम्रता संभेराव यांचा उत्स्फूर्त अभिनय आणि नृत्य, तसेच प्रसाद खांडेकर यांनी साकारलेली कुटुंबप्रमुखाची भूमिका विशेष दाद मिळवून गेली. भाग्यश्री मिलिंद, ओंकार राऊत, भक्ती देसाई आणि प्रथमेश शिवलकर यांनीही आपल्या भूमिका प्रभावीपणे साकारत नाटकाची रंगत वाढवली.
सौजन्य: श्रीकांत पवनीकर ,संपर्क मित्र