पाळीव कुत्र्याला फिरवताना महिलेचा विनयभंग

    दिनांक :06-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
woman molested नरेंद्रनगर परिसरात पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी गेलेल्या एका ३२ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी ५५ वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी आरोपीला घटनास्थळीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
 
 
 
woman molested
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वसुंधरा एन्क्लेव्ह गेटसमोरील रस्त्यावर ही घटना घडली. तक्रारदार महिला पाळीव कुत्र्याला फिरवत असताना आरोपी तिच्याजवळ आला. सुरुवातीला त्याने कुत्र्याला थोपटले. त्यानंतर महिलेला अयोग्य पद्धतीने स्पर्श करुन तिचा विनयभंग केला. तसेच अश्लील हावभाव करून तिचा छळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने मोठ्याने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी आरोपीला पकडून त्याची चौकशी केली आणि तत्काळ बेलतरोडी पोलिसांना माहिती दिली.woman molested पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले. महिलेच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे