०.४३ हेक्टर शेताच्या क्षेत्रासाठी ३४ वर्षांपासून फरफट

वृद्ध शेतकरी कंटाळला

    दिनांक :07-Aug-2026
Total Views |
समुद्रपूर,
043 hectares of farmland for 34 years तालुक्यातील हळदगाव येथील शेतकरी घनश्याम वरटकर (६६) ०.४३ हेक्टर शेताच्या क्षेत्रासाठी ३४ वर्षांपासून फरफट आहे. मात्र, अद्यापही न्याय मिळाला नाही. मौजा हळदगाव येथील शेतकरी घनश्याम वरटकर यांच्या शेतजमिनीच्या पुनर्मोजणीत ०.४३ हेक्टर क्षेत्र कमी दाखविण्यात आले. या त्रुटीची चौकशी करून २० फेब्रुवारी १९९२ रोजी एकत्रीकरण अधिकार्यांनी क्षेत्र दुरुस्तीचे आदेश दिले. मात्र, ते आजतागायत ७/१२, गाव नकाशा आणि भूमी अभिलेखात लागू झालेले नाहीत.
 
 
043 hectares of farmland for 34 years
 
धक्कादायक बाब म्हणजे २०१६ आणि २०१७ मधील अधिकृत मोजण्यांतही तफावत स्पष्ट झाल्याची नोंद असूनही संबंधित कार्यालयांनी दुरुस्तीची कार्यवाही केली नाही. एवढेच नव्हे तर १९९२ च्या आदेशाची मूळ प्रत कार्यालयात उपलब्ध नसल्याचेही अर्जदाराला लेखी कळविण्यात आले आहे. दरम्यान, एका कार्यालयातून दुसर्या कार्यालयात हेलपाटे मारताना तब्बल ३४ वर्षे उलटल्याने वृद्ध शेतकर्याला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागल्याचा आरोप जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकार्यांची जबाबदारी निश्चित करावी, दफ्तर दिरंगाईस कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करावी आणि प्रलंबित क्षेत्र दुरुस्ती तातडीने पूर्ण करून न्याय द्यावा, अशी मागणी घनश्याम वरटकर यांनी केली आहे.