ai -brain ‘प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले. मेंदूचे सर्वच भाग एकाच गतीने वृद्ध होत नाहीत. काही भाग दीर्घकाळ सक्षम राहतात, तर काही भागांवर वय आणि आजारांचा परिणाम वेगाने होतो. मेंदूच्या ठरावीक भागांच्या वाढत्या वयाचा अभ्यास करून, मेंदूचा कोणता भाग अपेक्षेपेक्षा वेगाने वृद्ध होत आहे आणि त्याचा बौद्धिक क्षमतेवर कसा परिणाम होतो, हे ओळखणे शक्य होणार आहे, अशी माहिती या संशोधनाचे प्रमुख आणि युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाचे सह-प्राध्यापक आंद्रेई इरिमिआ यांनी दिली.
ai -brain निर्णय क्षमता आणि स्मरणशक्तीशी संबंधित असलेले मेंदूचे ‘फ्रंटल’ आणि ‘टेम्पोररल’ भाग हे इतर भागांच्या म्हणजेच पॅरिएटल आणि ऑक्सिपिटलच्या तुलनेत अधिक वेगाने वृद्ध होत असल्याचे आढळले. व्यक्ती डावखुरी असो वा उजव्या हाताने काम करणारी, मेंदूचा उजवा भाग (राइट हेमिस्फियर) हा डाव्या भागापेक्षा काहीसा अधिक वृद्ध झाल्याचे दिसून आले. अल्झायमर किंवा स्मरणशक्ती कमजोर झालेल्या रुग्णांमध्ये मेंदूच्या ‘हिप्पोकॅम्पस’ आणि ‘अमिग्डाला’ या स्मरणशक्तीशी संबंधित गाभ्याच्या भागांचे जैविक वय अधिक आढळले.
मेंदूचे वय आणि बौद्धिक कार्यक्षमतेत संबंध
ai -brain मेंदूचे वय आणि प्रत्यक्षातील बौद्धिक कार्यक्षमता यांच्यातील थेट संबंध या संशोधनामुळे सिद्ध झाला असून, अल्झायमरसारख्या आजारांचे वेळेत निदान करण्यासाठी ही एआय प्रणाली अत्यंत प्रभावी ठरेल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.