बलुचिस्तान स्वतंत्र देश
बलुच लिबरेशन आर्मीची घोषणा, ११ ऑगस्टला प्रजासत्ताक दिनी साजरा करणार
दिनांक :07-Aug-2026
Total Views |
क्वेटा
balochistan baloch-liberation-army बलुचिस्तान प्रांत पाकिस्तानपासून वेगळा झाला असून, आता हा स्वतंत्र देश आहे आणि ११ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल, अशी घोषणा बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने शुक्रवारी केली. पाकिस्तानी लष्कर आणि सरकारविरोधात बलुच नागरिकांमध्ये संताप आहे आणि सर्व सहमतीने आम्ही पाकिस्तानपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. येत्या काळात सरकारी इमारती, प्रतिष्ठाने आणि पोलिस चौक्यांवर ताबा मिळवला जाईल.११ ऑगस्ट हा बलुचिस्तान प्रजासत्ताकाचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जाणार आहे.
balochistan baloch-liberation-army बलुचिस्तानी नागरिकांनी गावागावात हा दिवस साजरा करावा, यासोबतच जगभरातील बलुच लोकांनी देखील यात सहभागी व्हावे असे आवाहन बलुच नेते बलुच नेते बशीर झेब यांनी केले आहे. त्यांनी एका निवेदनात म्हटले की, बलुचिस्तान नागरिकांनी देशाच्या स्वातंत्र्य घोषणा एकमताने केली असून, आता आंतरराष्ट्रीय समुदायाने आम्हाला मान्यता द्यावी. ७० वर्षांच्या संघर्षानंतर बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळा झाला आहे. अत्याचार आणि अपमानास्पद वागणुकीतून आमची मुक्तता झाली आहे. पाकिस्तानी लष्कर आणि पोलिसांनी तातडीने आमचा देश सोडून चालते व्हावे, अन्यथा त्यांना जीवाला मुकावे लागेल.
balochistan baloch-liberation-army बलुच लिबरेशन आर्मीने स्वातंत्र्याची घोषणा करूनही अद्याप पाकिस्तानी सरकारच्या वतीने यावर प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पाकिस्तान या घोषणेमागील गटाला बलुचिस्तानचा कायदेशीर प्रतिनिधी म्हणून मान्यता देत नाही. त्यामुळे, अधिकृत प्रतिसादाद्वारे त्यांच्या दाव्यांना महत्त्व दिले जात नसल्याचे पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले. सुरक्षा यंत्रणा गुप्तचर आणि कायद्याची अंमलबजावणी या उपायांद्वारे बलुचिस्तानचा प्रश्न हाताळत असल्याने सरकारने मौन बाळगले आहे.