वर्धा,
brahmakumaris 10 crore pledge प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे देशभरात १० कोटी प्रतिज्ञा महाअभियान सुरू करण्यात आले आहे. प्रतिज्ञाच्या माध्यमातून युवक, विद्यार्थी, महिला आणि समाजातील सर्व घटकांना नशामुक्त, सकारात्मक आणि सुसंस्कृत जीवनशैली अंगीकारण्यासाठी प्रेरित करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. या अभियानाचा शुभारंभ वर्धेतही करण्यात आला.
ब्रह्माकुमारीज सेवाकेंद्र येेथे उद्घाटनप्रसंगी प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. सचिन पावडे, राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्त राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त घोडे महाराज, संघपाल महाराज, सेवा निवृत्त मुख्याध्यापक सतीश जगताप, गजानन जिकार, सेवा निवृत्त मुख्याध्यापक श्याम भेंडे, पोलीस मित्र दक्ष फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रकाश खंडार, शिक्षक वर्षा जोगे, ब्रह्मकुमारीजच्या संचालक माधुरी दिदी यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. पावडे म्हणाले की, व्यसन करायचे असेल तर चांगल्या गोष्टींचे करा ज्या व्यसनाचा परिवाराला, समाजाला आणि देशाला काही फायदा होईल. संघपाल महाराज यांनी विकसित भारताच्या निर्माणासाठी तरुणांनी व्यसनमुक्त राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. सतीश जगताप यांनी व्यसनाची गंभीरता सांगून आम्हीही या व्यसनमुक्ती अभियानामध्ये सक्रिय राहून भारताला व्यसनमुक्ती करण्यात योगदान देऊ असे सांगितले माधुरी दिदी यांनी समाज आणि राष्ट्र आपोआप सशक्त होईल. या जनआंदोलनात सर्व नागरिकांनी सहभागी होऊन नशामुक्त भारत घडवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी व्यसनापासून मुक्त राहू अशी प्रतिज्ञा घेतल्या गेली. प्रास्ताविक तृप्ती दिदी यांनी केले. संचालन स्नेहा दिदी यांनी तर आभार अविनाश यांनी मानले.