नागपूर,
Chitnavis Center Tamarind Hall चिटनवीस सेंटरतर्फे शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता टॅमरिंड हॉल येथे तरुण शास्त्रीय गायक स्वर शर्मा यांच्या गायन मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. मेवाटी घराण्याचे प्रतिनिधित्व करणारे स्वर शर्मा हे पं. रतन मोहन शर्मा यांचे सुपुत्र व पद्मविभूषण पं. जसराज यांचे नातू आहेत.
या मैफिलीत त्यांना दिलरुबा वादक ऋषिकेश करमरकर आणि तबला वादक तरुण लाला यांची साथ लाभणार आहे. शास्त्रीय संगीतप्रेमींनी या सुरेल मैफिलीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सौजन्य:योगिता चकोले,संपर्क मित्र