नागरिकांनी वाचविला १२ जनावरांचा जीव

गोतस्कर वाहनासह ताब्यात

    दिनांक :07-Aug-2026
Total Views |
शिरखेड
amravati news नागरिकांनी १२ गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणारा ट्रक पकडून आरोपीसह शिरखेड पोलिसांच्या स्वाधीन केला. मोर्शी ते अमरावती रोडवरील शिरखेड ते लेहगाव दरम्यानच्या इंडियन पेट्रोल पंपावर जनावरांची गाडी नागरिकांनी पकडून शिरखेड पोलिसांना फोन केला. ठाणेदार ईश्वर वर्गे यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. तिथे लोकांची गर्दी होती. त्यांनी गाडीच्या चालकाला पकडून ठेवले होते. शिरखेड पोलिसांनी पंचासमक्ष सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात जानवरे कोंबून भरल्याचे दिसले. मोहम्मद इसराइल नूर मोहम्मद (३२) रा. शरिफा मशीदजवळ धरम काटा, वलगाव रोड असे पकडलेल्या आरोपीने आपले नाव सांगितले.

amravati photo 
 
amravati news  मोहम्मद इसराइलने मध्यप्रदेश सीमेवरून मोकाट फिरत असलेली जनावरे ताब्यात घेतल्याचे व ही जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. या प्रकरणातील पोलिस कर्मचारी मयूर कापडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी मोहम्मद इसराइल नूर मोहम्मद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यात वापरले बोलेरो पिकअप वाहन आणि १२ गोवंश जनावरे असा एकूण ३ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
 
amravati news  ही कारवाई ठाणेदार ईश्वर वर्गे, पोलिस हेड कॉन्स्टेबल विनोद मनोहरे, पोलिस कॉन्स्टेबल अमित राऊत, पोलिस कॉन्स्टेबल धीरज डोंगरे आदींनी पार पाडली. पुढील तपास पीएसआय किसन धुर्वे व हेड कॉन्स्टेबल पुंजाराम मेटकर करीत आहे.