बुलढाणा,
workshop for farmers डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या जैविक निविष्ठांचा शास्त्रोक्त वापर केल्यास जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास तसेच उत्पादनक्षमता वाढविण्यास मदत होते. सोयाबीन पिकाच्या व्यवस्थापनात उत्पादनवाढीसोबत मृदा आरोग्य सुधारण्यावरही भर देण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्र बुलढाण्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. अमोल झापे यांनी केले. मार्गदर्शन करताना त्यांनी शेतकर्यांच्या पीकविषयक विविध शंकांचे निरसन करून आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम २०२६ अंतर्गत सामूहिक तेलबिया पीक प्रात्यक्षिक, शेतकरी प्रशिक्षण, चर्चासत्र तसेच प्रक्षेत्र भेटीचे आयोजन नागापूर (ता. मेहकर) येथे करण्यात आले. याच उपक्रमांतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत शेती शाळेचा तिसरा वर्गही घेण्यात आला.मंडळ कृषी अधिकारी राजूरकर, उपकृषी अधिकारी धांडे, सहाय्यक कृषी अधिकारी जंजाळ, तंत्र अधिकारी विजय सरोदे तसेच समूह सहाय्यक अजय खराटे यांनी तेलबिया पिकांचे व्यवस्थापन, पीक संरक्षण आणि विविध शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला नागापूरच्या सरपंच कल्पनाबाई समाधान गायकवाड, कृषी सखी चैताली धाबे, महिला बचत गटांच्या सदस्यांसह प्रगतिशील शेतकरी व महिला शेतकर्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.कृषी विज्ञान केंद्र, बुलढाण्याचे विषय विशेषज्ञ डॉ. वाडकर यांनी सामूहिक पीक प्रात्यक्षिकाच्या उद्दिष्टांची माहिती दिली. गावस्तरावर पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून, शेतकर्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यशाळेत कृषी शास्त्रज्ञ व कृषी विभागाच्या अधिकार्यांनी शेतकर्यांच्या प्रक्षेत्रांना भेट देऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.workshop for farmers पिकांमध्ये उदभवलेल्या समस्यांवर शास्त्रोक्त उपाय सुचविण्यात आले. प्रत्यक्ष शेतावर मिळालेल्या मार्गदर्शनामुळे शेतकर्यांनी विविध शंकांचे निरसन करून घेतले. कार्यक्रमास गणेश धाबे, पवन धाबे, सुधाकर धाबे, विलास धाबे, नंद गायकवाड, समाधान गायकवाड, नंदकिशोर किल्लारी, इलियास खान यांच्यासह नागापूर गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा तसेच गावातील शेतकरी बांधवांनी सहकार्य केले.