नाशिकमध्ये साकारणार देशातील पहिले ‘ज्ञान-तंत्रज्ञान संगम केंद्र’
केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमीन सुपूर्द
दिनांक :07-Aug-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
मुंबईknowledge-technology-convergence-centre भारताची प्राचीन ज्ञानपरंपरा आणि आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाची अनोखी सांगड घालणारा देशातील अग्रगण्य शैक्षणिक प्रकल्प आता नाशिकमध्ये उभारला जाणार आहे. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या प्रस्तावित नाशिक परिसरासाठी आरक्षित सुमारे ४१.५१ एकर जमिनीचा ७/१२ उतारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विद्यापीठाच्या प्रतिनिधींना अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आला आहे.
knowledge-technology-convergence-centre शिलापूर गावात रिंगरोडलगत ही जमीन हस्तांतरित झाल्यामुळे विद्यापीठाच्या उभारणीची प्रशासकीय प्रक्रिया आता गतिमान झाली आहे. सांस्कृतिक वारसा जपत नाशिकला उच्च शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञानाचे राष्ट्रीय केंद्र म्हणून विकसित करण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
knowledge-technology-convergence-centre ४०० कोटींचा प्रकल्प आणि आधुनिक अभ्यासक्रम भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या या विद्यापीठाचा सुमारे ४०० कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आला असून तो केंद्र शासनाच्या विचाराधीन आहे. या अत्याधुनिक, बहुविद्याशाखीय परिसरात संस्कृत माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स यासारख्या आधुनिक विषयांचे बी. टेक. अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अभिनव उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे.
१,५०० विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेशknowledge-technology-convergence-centre या आधुनिक कॅम्पसमध्ये तब्बल १,५०० विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळणार आहे. पारंपरिक संस्कृती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा हा संगम देशाच्या शैक्षणिक विकासातील एक ऐतिहासिक मैलाचा दगड ठरणार आहे. जमीन हस्तांतरण कार्यक्रमास कुलसचिव प्रा. आर. जी. मुरलीकृष्ण, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश इंदापवार, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.