पर्यावरण जनजागृती अभियान

    दिनांक :07-Aug-2026
Total Views |
यवतमाळ,
environmental awareness campaign जवाहर प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा येथे भारतीय जैन संघटना यवतमाळद्वारे पर्यावरण जनजागृती अभियान राबविण्यात आले. या प्रसंगी संस्थेच्या सचिव कल्पना मांगुळकर, भारतीय जैन संघटना विदर्भ सचिव शेखर बंड, विदर्भ कार्यकारणी सदस्य महेंद्र बोरा, शहराध्यक्ष डॉ. सारिका शाह, विनिता सिंग, नेहा पंडित, मुख्याध्यापक एमयू राऊत, जितेंद्र फुसे, संगीता जुमनाके उपस्थित होते. यावेळी विनीता सिंग, नेहा पंडित, शेखर बंड, सारिका शाह, कल्पना मांगुळकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन माधुरी टेकाडे यांनी केले. तर आभारप्रदर्शन जगदीश राजगुरे यांनी केले. कार्यक्रमासाठी राठोड, पवित्रकर, पाईकवर, मुळे, चोपडे, यमुलवार, मेहरे, ठाकरे, हांडे, ओवर, साबळे, राठोड व अंभोरे यांनी सहकार्य केले.
 

environmental awareness campaign