शेतकऱ्यांनो, कर्जमाफीसाठी केवायसीवर शुल्क देऊ नका

सेतू केंद्रात मोफत सेवा

    दिनांक :07-Aug-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
आर्णी,
farmers शेतकऱ्यांनो कर्जमाफीसाठी केवायसीवर कोणतेही शुल्क देवू नका, महा ई-सेवा व सेतू केंद्रात केवायसी मोफत सेवा आहे, असे आवाहन तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांनी केले आहे.
 
 
farmers
 
 
राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया सुरू असून, ही सेवा महा ई-सेवा केंद्र व सेतू केंद्रामार्फत पूर्णपणे मोफत करण्यात येत आहे. केवायसीसाठी कोणत्याही शेतकèयांकडून शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी समाज माध्यमावर दिली. तसेच आर्णी येथील तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांनी ही केवायसी सेवा मोफत असल्याची माहिती दिली आहे.
अनेक ठिकाणी केवायसीच्या नावाखाली काही केंद्रांकडून पैसे घेत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मात्र, शासनाने केवायसी प्रक्रिया निःशुल्क ठेवली आहे. कोणत्याही प्रकारचे शुल्क देण्याची गरज नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोणतेही केंद्र केवायसीसाठी पैसे मागत असेल, तर संबंधित तहसील कार्यालय, जिल्हा प्रशासन किंवा संबंधित विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.farmers शासनाच्या या निर्णयामुळे शेतकèयांना आर्थिक दिलासा मिळणार असून, कर्जमाफी प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यास मदत होणार आहे.
कर्जमाफीची केवायसी केवळ अधिकृत महा ई-सेवा केंद्र व सेतू केंद्रातच करून घ्यावी. कोणत्याही व्यक्तीच्या भूलथापांना बळी पडू नये आणि केवायसीसाठी कोणतेही शुल्क देऊ नये. शासनाने ही सेवा सर्व पात्र शेतकèयांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे.
- वैशाख वाहूरवाघ,
तहसीलदार, आर्णी