आशियाई एरोबिक जिम्नॅस्टिक्स अरिहा पांगमबामला सुवर्ण
दिनांक :07-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली
gymnastics आशियाई एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत वरिष्ठ महिलांच्या वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी अरिहा पांगमबाम ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
gymnastics या भारतीय जिम्नॅस्टने अंतिम फेरीत १९.१०० गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले आणि आशियाई स्पर्धेत भारतासाठी या प्रकारातील पहिले सुवर्णपदक जिंकले. अरिहाने कलात्मकतेसाठी ८.६५०, सादरीकरणासाठी ७.६०० आणि कठीणतेसाठी २.८५० गुण मिळवित हे विजेतेपद निश्चित केले.
gymnastics ही आमच्यासाठी एक मोठी कामगिरी आहे. तिने उत्कृष्ट कामगिरी केली. तिचे आणि तिच्या प्रशिक्षकाचे अभिनंदन, असे जिम्नॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुधीर मित्तल यांनी म्हटले.