भद्रावती
st-driver-and-conductor प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवाशांना अक्षरशः वार्यावर सोडल्याची तक्रार भद्रावती बसस्थानकावर केली गेली. बसचे ‘हेडलाईट’ बंद असल्याचे कारण पुढे करीत, चालक व महिला वाहकाने तब्बल 20 प्रवाशांना बसमध्ये न घेता नागपूरच्या दिशेने बस दामटल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
st-driver-and-conductor चंद्रपूर बसस्थानकातून नागपूरकडे निघालेली एमएच 14 एक्सएल 8834 क्रमांकाची बस शुक्रवारी दुपारी सुमारे 2 वाजता भद्रावती बसस्थानकावर पोहोचली. यावेळी बसचे ‘हेडलाईट’ बंद असल्याचे सांगण्यात आले. मात्र, बसमध्ये प्रवाशांना घेऊन जाण्याऐवजी चालक व वाहकाने सुमारे 20 प्रवाशांना बसस्थानकावरच सोडून दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी नागपूरच्या दिशेने बस रवाना केल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. प्रवाशांना का घेतले नाही, असा प्रश्न एका प्रवाशाने चालकाला विचारला असता, सौजन्यपूर्ण उत्तर देण्याऐवजी चालकाने कथितरीत्या उद्धट आणि अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोपही आहे.
st-driver-and-conductor या प्रकारामुळे भद्रावती बसस्थानकावर काही काळ संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकार्यांनी तातडीने दखल घेऊन प्रवाशांना न घेता बस रवाना करण्यामागील कारणांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.