ज्येष्ठांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा : डॉ. दीपक शेंडेकर

    दिनांक :07-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Hirkani Women's Group हिरकणी ज्येष्ठ महिला मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी सुधीर भगत होते, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. दीपक शेंडेकर उपस्थित होते.
 

1235
 
 
यावेळी डॉ. शेंडेकर यांनी ज्येष्ठ नागरिकांनी शासनाच्या विविध योजना, सवलती व कायदेशीर अधिकारांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. सभेत महिलांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सौजन्य:दीपक शेंडेकर ,संपर्क मित्र