हिंगणघाट,
municipal council president dr tulaskar जगात ज्ञानापेक्षा पवित्र दुसरं काहीचं नाही. नव्या उगवत्या तार्यांना ज्ञानाची आवड व गोडी लागावी यासाठी काय करता येईल यांच सतत मनन आणि चिंतन करून ते छोट्या पिलांसाठी पुस्तक म्हणून बाहेर आलं आणि अंगणवाडीच्या बालकांना त्यांच्यात अभ्यासाची आवड निर्माण होईल असा सुटसुटीत अभ्याक्रम नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांनी तयार केला. जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी त्यांना तयार केलेल्या अभ्यासक्रमाचे स्वागत करून हा अभ्यासक्रम वर्धा जिल्ह्यातील अंगणवाडीना लागू करण्याचे पत्रक जिल्ह्यातील सर्व नपना पाठविले आहे.

उच्चविद्याविभूषित नप अध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांनी छोट्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून अनेक लेखकांच्या विविध साहित्य कृतीचा अभ्यास करून त्यातील निवडक व संस्कारशील कविता निवडून बालमनाला मोहिनी घातल्या जाईल अशी आकर्षक चित्रं तयार करून मराठी गाणी, गणिताचे आकडे व ती मोजण्यासाठी रोजच्या दैनंदिन व्यवहारातील सुंदर चित्रं घालून बालकांना अभ्यास करण्याचा मोह व्हावा असं सुंदर आणि आकर्षक पुस्तक निर्मिती करून त्यांनी आजवर अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार अभ्यासक्रम तयार करून तो जिल्हाधिकार्यांना सादर केला. जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांना हा उपक्रम आवडला. त्यांनी सर्वं नगर परिषदेच्या सर्वं अंगणवाडीना हा अभ्यासक्रम लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.
नगराध्यक्ष पद केवळ शोभेचे पद नसून शहराचा एक पालक म्हणून त्यांची जबाबदारी किती व्यापक आणि सृजनात्मक असली पाहिजे याचा वस्तुपाठ डॉ. नयना तुळसकर यांनी घालून दिला आहे. केवळ रस्ते, नाल्या हेच केवळ उद्धिष्ट न ठेवता शहरातील नपच्या अंतर्गत येणार्या सर्वं घटकावर व्यवस्थित विचार करून त्यावर आवश्यक उपाययोजना करण्याचे त्यांचे ध्येय त्यांच्यातील मातृत्वाचे द्योतक असल्याचे जाणवते. डॉ नयना तुळसकर यांच्या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात येतं आहे.