किशोर दिघे भाजप वर्धा विधानसभा प्रभारीपदी

    दिनांक :07-Aug-2026
Total Views |
हिंगणघाट,
kishor dighe भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते व हिंगणघाट नपचे स्वीकृत सदस्य किशोर दिघे यांची वर्धा विधानसभा प्रभारीपदी नियुती करण्यात आली. भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.
 
 
kishor dighe
 
 
हिंगणघाट विधानसभा क्षेत्राच्या राजकीय वर्तुळात किशोर दिघे यांची चाणय म्हणून ओळख आहे. त्यांनी भाजपात यापूर्वी जिल्हा महामंत्री पदाची जबाबदारी सांभाळली आहे. एक कुशल संघटक म्हणून त्यांची ओळख आहे. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील तीन विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमदार समीर कुणावार यांचे प्रचाराची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली आहे. आता त्यांना वर्धा जिल्हा विधानसभेची जबाबदारी मिळाल्याने राज्यमंत्री पंकज भोयर यांचे करिता मोठी दिलासादायक बाब आहे. आगामी काळात वर्धा विधानसभा क्षेत्रात संघटन अधिक मजबूत करून भाजप उमेदवाराला पुन्हा एकदा विजयी पथावर नेऊ, असा विश्वास दिघे यांनी व्यत केला आहे.