अबब... चक्क कारमधून सुरु होती गांजा तस्करी

    दिनांक :07-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
 
नागपूर,
marijuana trafficking कारमधून गांजाची तस्करी करणार्‍या दोन तस्करांना कळमना पोलिसांनी अटक करून त्यांच्या ताब्यातून २.४३ किलो गांजा जप्त केला. गुरुवारी रात्री कळमना पोलिस पॅट्रोलिंगवर होते. त्यावेळी हस्तीनापूरकडून भिलगाव सिटीकडे जाणार्‍या रस्त्यावर नाल्याच्या बाजूला फोर्ड कंपनीच्या फिगो कारमध्ये दोघेजण बसलेले दिसून आले. पोलिसांनी संशयावरून त्यांची विचारपूस केली असता अतिक रफीकखान (३३) लेंडेनगर, आणि अमित विनायक मानकर (३७) सन्यालनगर, टेका नाका अशी त्यांनी नावे सांगितली.
 
 
marijuana trafficking
 
पोलिसांनी कारची झडती घेतली असता एका पोत्यात हिरव्या रंगाचा २ किलो ४३ ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी गांजा, २ मोबाईल, कार असा ४ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कळमना पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोघांनाही अटक केली. सदर कारवाई पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटिल, सहआयुक्त नविनचंद्र रेड्डी, उपायुक्त नित्यानंद झा, एसीपी रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन कळमना येथील ठाणेदार प्रवीण काळे यांच्या पथकाने केली.