भेदरलेल्या मुलीला पोलिसांनी दिला ‘आधार आणि विश्वास’

यु-ट्युबरील ‘हॉरर स्टोरी’त गुंतली गेली दहावीची विद्यार्थिनी

    दिनांक :07-Aug-2026
Total Views |
नागपूर, 
अनिल कांबळे 
terrified girl ऑनलाईन असलेली ‘हॉरर वेबसिरीज’ बघून आईचे अपहरण होऊन तिचा मर्डर केला जाईल, अशी भीती दहावीची विद्यार्थिनीच्या मनात भरली होती. ती भेदरल्यामुळे शाळेत जाऊन परत आली. घराच्या वर पडक्या खोलीत लपून बसली. दुसरीकडे मुलगी दिसत नसल्यामुळे मिसींगची तक्रार देण्यासाठी आलेल्या आईने पोलिस ठाण्यात रडारड केली. पोलिसांनी तिचा परिसरात इतरत्र शोध घेतल्यानंतर शेवटी घराच्या वरच्या माळ्यावरुन ताब्यात घेतले. तिने ‘हॉरर स्टोरी’ सांगताच ठाणेदाराने ‘आधार आणि विश्वास’ देत तिचे समूपदेशन केले. तिच्या मनातून भीतीचे सावट दूर केल्यानंतर पालकांच्या स्वाधीन केले.
 

terrified girl 
 
 
मनिषनगरात राहणारी महिलेच्या पतीच्या निधनानंतर १५ वर्षीय मुलीसह ती राहते. तिची मुलगी मयुरी (काल्पनिक नाव) ही दहावीची विद्यार्थिनी असून पिपळा येथील नामांकित शाळेत शिकते. तिच्या गेल्या काही दिवसांपासून स्वभावात फरक जाणवत होती. ती बुधवारी सकाळी शाळेत गेली आणि तासाभरात घरी परतली. तिने दप्तर ठेवले आणि वरच्या माळ्यावर गेली. दुसरीकडे मुलीचे दप्तर घरी आणि मुलगी बेपत्ता असल्यामुळे तिची आई घाबरली. तिने शोधाशोध केली आणि थेट बेलतरोडी पोलिस ठाण्यात धाव घेतली.terrified girl ठाणेदार रितेश अहेर यांना माहिती दिली. गेच उपनिरीक्षक रविकांत भदाणे, राजेंद्र महाजन, स्नेहलता जायभाये आणि अंकुश चौधरी यांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. पोलिसांनी घरापासून शाळेपर्यंतच्या मार्गावरील सुमारे ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले, बाजारपेठ, दुकाने, बसस्टॉप परिसराची पाहणी केली, शाळेतील शिक्षक, मैत्रिणी व स्थानिक नागरिकांची चौकशी केली. मात्र कोणत्याही सीसीटीव्हीमध्ये मुलगी आढळून न आल्याने पोलिसांना संशय आला.