सेंट लुईस
praggnanandhaa भारताच्या २० वर्षीय ग्रॅण्डमास्टर आर. प्रज्ञानंदने 'जीसीटी सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ' बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेत प्रज्ञानंदने सुरुवातीपासूनच आघाडी कायम राखली होती. उझबेकिस्तानच्या ग्रँडमास्टर जावोखिर सिंदारोव्हने त्याला जोरदार टक्कर दिली, परंतु तो प्रज्ञानंदपेक्षा १.५ गुणांनी मागे राहिला. प्रज्ञानंदने एक फेरी शिल्लक असतानाच आपले विजेतेपद निश्चित केले. सिंदारोव्ह या स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर राहिला.
praggnanandhaa जेव्हा तुम्ही गुणफलक पाहता... तेव्हा सर्व काही सहज वाटू शकते, पण प्रत्यक्षात तसे नव्हते. परिस्थिती खूपच आव्हानात्मक होती. जावोखिरचे कौतुक करायला हवे, त्याने शेवटपर्यंत झुंज दिली, असे प्रज्ञानंदने अंतिम फेरीनंतर सांगितले.
praggnanandhaa हे विजेतेपद जिंकल्यामुळे प्रज्ञानंदला ५० हजार डॉलर्सचे बक्षीस व १३ जीसीटी गुण मिळाले. या कामगिरीमुळे २०२६ च्या हंगामातील गुणतालिकेत तो अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनानंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचला. दरम्यान, मी सर्वोत्तम प्रयत्न केले, पण प्रज्ञानंद खूप चांगला खेळला. कधीकधी केवळ चांगला खेळ पुरेसा नसतो; नशिबाचीही साथ लागते, अशा शब्दांत सिंदारोव्हने खंत व्यक्त केली.
praggnanandhaa जीसीटी हंगामाची सांगता 'सिंकफील्ड चषका'ने होईल. ही स्पर्धा १० ऑगस्टपासून सुरू होणार असून, यात प्रज्ञानंदसह सेंट लुईस स्पर्धेतील बहुतांश खेळाडू सहभागी होणार आहेत.