राहुल गांधींच्या घराबाहेर साधू-संतांचे आंदोलन

    दिनांक :07-Aug-2026
Total Views |

Protest outside Rahul Gandhi
 
 
नवी दिल्ली,
Protest outside Rahul Gandhi's house लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर शुक्रवारी साधू-संतांसह अनेक जणांनी आंदोलन केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अचानक मोठ्या संख्येने आंदोलक घराबाहेर जमा झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलकांनी काँग्रेस पक्षाविरोधात घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. साधू-संतांसह इतर आंदोलकांनी राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू केल्यानंतर परिसरात गर्दी वाढली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. आंदोलनाची माहिती मिळताच दिल्ली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आंदोलकांना हटवण्याची कारवाई सुरू केली. यावेळी आंदोलन करणाऱ्या अनेक साधू-संतांना पोलिसांनी ताब्यात घेतले. परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली.