मुंबई,
Ramayan to be released on Raha's birthday रणबीर कपूर अभिनीत बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर स्पष्ट झाली आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा निर्मित हा भव्य चित्रपट ६ नोव्हेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे अधिकृत इंग्रजी ट्रेलरमधून समोर आले आहे.बुधवारी ‘रामायण’चा इंग्रजी डब ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ३ मिनिटे ५४ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीखही दाखवण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या हिंदी ट्रेलरच्या तुलनेत हा ट्रेलर १५ सेकंदांनी छोटा आहे. सोनी पिक्चर्सच्या अधिकृत पेजवर हा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे.

या चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्रीराम, साई पल्लवी माता सीता आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. निर्माते हा चित्रपट जागतिक स्तरावरील भव्य सिनेमॅटिक अनुभव म्हणून प्रेक्षकांसमोर आणत आहेत. इंग्रजी ट्रेलरमधील संवादांसाठी प्रमुख कलाकारांनी स्वतः इंग्रजी डबिंग केल्याचेही सांगण्यात आले आहे.‘रामायण’ दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे बजेट जवळपास ४००० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. पहिला भाग ६ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होईल, तर दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ६ नोव्हेंबर ही तारीख रणबीर कपूरची मुलगी राहाच्या वाढदिवसाच्या आसपास असल्याने सोशल मीडियावर याबाबत चर्चाही सुरू झाली आहे. मात्र, चित्रपटाची अधिकृत रिलीज तारीख ६ नोव्हेंबर असल्याचे ट्रेलरमधून स्पष्ट झाले आहे.