अमरावती
ravi-rana देशात क्रमांक एकचा पक्ष असलेल्या भाजपातले निर्णय घेण्या इतका आमदार रवी राणा मोठा नाही. त्याने थापा मारणे व नाैटंकी करणे बंद करावे. अन्यथा आम्हाला बडनेरा मतदारसंघातले घोळ बाहेर काढावे लागतील, असा सज्जड दम आमदार राजेश वानखडे व भाजपा पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिला.
ravi-rana यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आ. प्रताप अडसड, आ. प्रवीण पोटे, भाजपाचे विदर्भ संयोजक प्रा. दिनेश सूर्यवंशी, प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, जयंत डेहनकर, तुषार भारतीय, चेतन गांवडे, चेतन पवार, नितीन गुडधे, विवेक गुल्हाने, प्रदीप गाैरखेडे, सोपान गुडधे यांच्यासह अन्य हजर होते. आ. वानखडे पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख कार्याने प्रभावित होऊन मी भाजपात आलो. सक्रियतेने कार्य केल्यानंतर मला तिवसा विधानसभेची उमेदवारी मिळाली. जनता व भाजपा कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने विजयी झालो. संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण आपणच घडवतो असा गोड गैरसमज करून घेतलेल्या नौटंकीबाज रवी राणा यांनी भाजपाच्या विजयाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये. त्यांनी इतरांच्या मतदारसंघात येऊन अनावश्यक लुडबुड केली तर त्यांच्या बडनेरा मतदारसंघात त्यांनी करून ठेवलेले घोळ जनतेसमोर आणावे लागतील.
ravi-rana विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाचे उमेदवार निवडून आणण्या ऐवजी अमरावती आणि दर्यापूरमध्ये महायुतीचे उमेदवार कसे पराभूत होतील यासाठी रवी राणा आपली शक्तीपणाला लावत होते. बडनेऱ्यात देवेंद्रजींचे नेतृत्व आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या परिश्रमांमुळे कधी नव्हे तेवढे मताधिक्य राणाला मिळाले, याचा विसर पडू देऊ नका. खोटारडेपणा, बनवाबनवी, वैचारिक कोलांटउड्या, न केलेल्या कामाचे खोटे श्रेय घेणे आणि नौटंकी हा तुमच्या राजकारणाचा पाया आहे. अमरावती जिल्ह्यातील भाजपा खिळखिळी झाली तर महायुतीतले तुमचे वजन वाढते राहील या भावनेने तुम्ही भाजपाला नख लावण्याचा प्रयत्न करता हे आम्ही खपवून घेणार नाही. महानगरपालिका निवडणुकीत भाजपा सोबत तुम्ही केलेली बेईमानी आम्ही विसरलेलो नाही. त्याचे दुष्परिणाम तुम्हाला योग्य वेळी भोगावेच लागतील. तिवसा विधानसभा मतदारसंघात तुम्ही उमेदवारी जाहीर होईपर्यंत कोणकोणते गेम केले, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. भाजपातील उमेदवारी तुमच्या सांगण्यावरून दिली जाते, या थापा मारणे बंद करा, असा दम आ. वानखडे यांनी दिला.
काय म्हणाले होते रवी राणा
ravi-rana मी जे बोलतो ते नेहमी सत्य होते. भविष्यात तिवस्यात बदल निश्चित आहे आणि तो रवी राणा करणार आहे. रविराज देशमुख हा भाजपाचा सच्चा व प्रामाणीक काम करणारा कार्यकर्ता आहे. तिवसा विधानसभेचे आमदार रविराज देशमुख होते. पण, त्यांची तिकीट कापण्याचे काम मीच केले, असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी गुरुवारी रविराज देशमुख यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात केले होते.