शेतकरी पोर्टलवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करा: जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे

८२ हजार ६२७ शेतकर्‍यांचे ई-केवायसी पूर्ण

    दिनांक :07-Aug-2026
Total Views |
बुलढाणा,
dc dr pravinkumar deore राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ’पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती अंतर्गत १ लाख १६ हजार ४३६ पात्र शेतकर्‍यांची कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यापैकी ८२ हजार ६२७ शेतकर्‍यांचे ई-केवायसी पूर्ण झाली असून ३३ हजार ८०९ शेतकर्‍यांचे ई-केवायसी प्रलंबित आहे. त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकर्‍यांनी अ‍ॅग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले. कर्जमुक्ती योजनाची पात्र शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
 
 

dc dr pravinkumar deore 
 
 
या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे २ लाख २७ हजार ६४६ शेतकर्‍यांना कर्जमुक्ती आणि प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्येही प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रत्येक पात्र लाभार्थ्याच्या कर्ज खात्याला विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे.dc dr pravinkumar deore त्याआधारे अ‍ॅग्रीस्टॅकवरील नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. ज्या शेतकर्‍यांना आपल्या पात्रतेबाबत अथवा योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात काही तक्रार अथवा शंका असेल, त्यांनी जिल्हास्तरीय समितीकडे तक्रार नोंदवावी. तसेच अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक ०२२-४९१५०८०२ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. विशेष सवलत (हेअर कट) : शेतकर्‍यांचे कर्जखाते अनुत्पादित (एनपीए) झाले असल्यास, नॅशनल बँकांना थकीत कालावधीच्या टप्प्यानुसार विशेष सवलत दिली जाणार आहे.