दिग्रस,
sadhvis arrive in nagar for chaturmas जैन समाजातील नागरिक स्व.जबरचंद भंडारी यांच्या कन्या व तिर्थ उद्धारक चारुवर्ता यांच्या शिष्य नम्रवर्त व मग्नवर्ता यांचे 36 वर्षानंतर जन्मभूमी असलेल्या दिग्रस शहरात चातुर्मास कार्यक्रमानिमित्त जैन उपाश्रयात आगमन झाले. त्यांच्या समवेत साध्वी मीतवर्त यांचेही आगमन झाले. यावेळी जैन श्री संघाच्या वतीने प्रमुख मार्गाने प्रवेश सोहळा साजरा करण्यात आला. या प्रवेश सोहळ्याला इंदौर, अकोला, पुणे, दारव्हा व इतर ठिकाणचे भावीक उपस्थित होते.