कळंब,
self reliant farmer campaign आत्मनिर्भर शेतकरी अभियानांतर्गत बियाणे स्वावलंबन मार्गदर्शन व विद्यार्थी गुणवंत गौरव सोहळा पार नुकताच पडला. इंदिराजीव अखंड ज्योती परमार्थिक ट्रस्ट व कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकèयांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नागपूरचे वरिष्ठ प्रा. डॉ. दीपक सपकाळ, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक सुरेश मोहोकार यांनी मार्गदर्शन केले. सुरेखा पंजाब भिसे यांच्या स्मरणार्थ दोन शवपेट्यांचे लोकार्पण करण्यात आले.

चिंचोली येथील शर्वरी सुरेश सुर्यवंशी हिला लॅपटॉप भेट देण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन सभापती देशमुख व उपसभापती महादेव काळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. यावेळी हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रफुल चौहान, महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्सचे अध्यक्ष वसंत घुईखेडकर, तालुका कृषी अधिकारी सुहास भेंडे, अरुण राऊत, नाना गाडबैले, व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आनंद जगताप, चंद्रशेखर चांदोरे, सुदाम पवार, दीपक कदम, मधुकर चावरे, निरंजन ठाकरे, कल्पना जगताप, उषा बागमारे, लीलाधर चावरे, प्रताप झोटिंग, सचिन दरणे, नारायण पिसे, हरीभाऊ कराळे, महेंद्र रहेटिया, शशिकांत देशमुख, राहूल कदम, राजेंद्र भोयर यांनी परिश्रम घेतले.