सेलूत बसस्थानकही गळकं; विकासाला कासवाची साथ!

    दिनांक :07-Aug-2026
Total Views |
सेलू,
selu bus stand also leaky सेलूत नव्याने टाकण्यात येत असलेली नळ योजनेच्या जलवाहिनीचे काम संथगतीने सुरू असून शहरातील चांगल्या रस्त्याचे विद्रुपीकरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. बस स्थानक गळू लागले आहे. अवघ्या काही वर्षात त्याचीही दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे नवीन इमारत बांधकामाचा नारळ फुटून एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला. कामाची कासव गती पाहता हे काम पूर्ण होण्यास किती कालावधी लागणार हा संशोधनाचा विषय बनला आहे.

selu bus stand also leaky 
 
दोन वर्षा अगोदर थाटामाटात लोकार्पण सोहळा घेऊन शहरात मध्यवर्ती बस स्थानकाची नवी इमारत रुजू झाली. पण, याच काळात त्या इमारतीला गळती लागली अन् त्या इमारतीचे छत आता पडण्यात आले असून नवे छत टाकण्याची वेळी शासन प्रशासनावर आल्याने सेलू शहराचा विकास कुणी पाहिला का तो कसा असतो असे म्हणण्याची वेळ आली आहे. यशवंत चौकात असणारा उड्डाण पूल पाडण्यात आला या चौकाचा विस्तार सौंदर्यीकरण करण्याच्या नावावर वर्षावर वर्ष लोटत चालले असताना येथे अपघात, धुळीच्या कणाचा त्रास पाहता नागरिक व वाहन धारक त्रस्त झाले आहे.
 
  
जुन्याच ग्रामपंचायतचे इमारतीचा फलक बदलवून नगर पंचायत असा फलक लावण्यात आला. पण, नगर पंचायतची नवी इमारत कधी होणार हा विषय आता सुरू झाला आहे. नगर पंचायत पेक्षा ग्रामपंचायत बरी म्हणण्याची वेळ आली आहे. अवघ्या काही महिन्यांत सेलू नगर पंचायतची मुदत संपत आहे. नव्याने निवडणुका होण्याची शक्यता पाहता विविध राजकीय व सामाजिक संघटना सेलू शहराच्या समस्या घेऊन पुढे येत आहेत. त्यामुळे सेलू समस्याग्रस्त असल्याचे दिसून येत आहे. सेलू नगर पंचायतवर शिवसेनेचे नगराध्यक्ष आहे, हे विशेष.