अनिल कांबळे
नागपूर,
sexually abused हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २६ वर्षीय विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा विवाह २०१८ मध्ये झाला होता. मात्र, लग्नानंतर सुमारे दीड वर्षांतच तिच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर ती आई-वडिलांसोबत राहत होती. पुनर्विवाहाच्या उद्देशाने तिने एका मॅट्रिमोनियल वेबसाइटवर स्वतःचे प्रोफाइल तयार केले होते. याच माध्यमातून तिची ओळख वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील येनोरा येथील अग्निवेश मेघराज भगत (२६) याच्याशी झाली. दोघांमध्ये संवाद सुरू झाल्यानंतर आरोपीने पीडितेशी लग्न करण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीच्या आश्वासनावर विश्वास ठेवून तिने त्याच्याशी संबंध ठेवले. २५ मार्च २०२५ ते ९ मे २०२६ या कालावधीत हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कल्पतरू नगर येथील ‘हॅपी स्टे इन ओयो’ येथे आरोपीने लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी अनेक वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले.sexually abused यानंतर पीडितेने विवाहाबाबत आग्रह धरल्यानंतर आरोपी टाळाटाळ करू लागला आणि अखेर लग्न करण्यास नकार दिला, असा आरोप तिने केला आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अग्निवेश मेघराज भगत याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.